संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळेत 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
=============================

अहिल्यानगर – भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रमशाळेत देशभक्तीच्या उत्साहात, मोठ्या दिमाखात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद फुंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. भगवान वाघ, केवीएस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय उमाप, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, विश्व हिंदू परिषदेच्या जिल्हा संघटक ज्योती पोटे, रणरागिनी फाउंडेशनच्या अध्यक्षा रोहिणी ताई पवार, द्वारका पवार, वस्तीगृह अधीक्षक डोळे सर, तसेच नागरे सर, दहिफळे सर यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रभावी भाषणे सादर केली. यात स्वातंत्र्य संग्रामातील वीर योद्ध्यांचे योगदान, स्वातंत्र्यानंतरचा भारताचा प्रवास, लोकशाहीचे महत्त्व, आणि संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्ये यावर प्रकाश टाकण्यात आला.
अध्यक्ष ॲड. मिलिंद फुंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्वातंत्र्य हे केवळ भूतकाळातील वारसा नसून पुढील पिढ्यांसाठी जपण्याची जबाबदारी आहे. देशभक्ती फक्त 15 ऑगस्टला नव्हे, तर रोजच्या जीवनात कृतीतून दिसली पाहिजे. स्वच्छ भारत, साक्षरता आणि समाजातील एकोपा वाढविणे ही खरी देशसेवा आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात प्रगती हाच आधुनिक स्वातंत्र्याचा मार्ग आहे.”
सचिव डॉ. भगवान वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस आदी स्वातंत्र्यसैनिकांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. “शिस्त, परिश्रम आणि प्रामाणिकपणा ही यशस्वी व प्रगत भारताची तीन मुख्य सूत्रे आहेत,” असे ते म्हणाले.
यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. गेल्या आठ दिवसांपासून केवीएस अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष विजय उमाप सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटिका, देशभक्तीपर गीते व वेशभूषा सादरीकरणातून थोर पुरुषांचे विचार प्रभावीपणे मांडले. त्यांच्या या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. मिलिंद फुंदे यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, गावकरी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी गर्जे सर, गिते सर, आंधळे सर, जाधव सर, चौधरी सर, गिते मॅडम, मोनाली फुंदे मॅडम, द्वारका पवार, लीला फुंदे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहिफळे सर यांनी केले व आभार प्रदर्शन नागरे सर यांनी केले.

By master

Leave a Reply