केवीएस अकॅडमीच्या माध्यमातून श्री वीरभद्र आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार नृत्यविष्काराचे धडे

जयश्री पोटे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य
=============================

अहिल्यानगर – संजीवनी मेडिकल ट्रेनिंग सेंटर संचलित श्री वीरभद्र प्राथमिक आश्रम शाळा, बारादरी येथील विद्यार्थ्यांसाठी एक अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नामांकित केवीएस अकॅडमीचे संस्थापक माननीय विजय उमाप सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षण दिले जात आहे.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध सांस्कृतिक कलांचे, पारंपरिक व समकालीन नृत्य प्रकारांचे सखोल ज्ञान मिळणार आहे. नृत्याविष्कारासोबतच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सृजनशीलता आणि आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
या संपूर्ण उपक्रमासाठी जयश्री पोटे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना बालसंस्कारांचे मूल्याधारित प्रशिक्षण व नृत्य कलांचे शिक्षण एकत्रित स्वरूपात मिळणार आहे.
या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. डॉ. भगवान वाघ यांनी विजय उमाप सरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला आणि त्यांच्या योगदानाबद्दल मनःपूर्वक आभार मानले. यावेळी श्री वीरभद्र आश्रम शाळेचे सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कला व संस्कार यांचे अनोखे शिक्षण मिळवून देणारा स्तुत्य उपक्रम ठरत आहे.

By master

Leave a Reply